गोवा : कमीतकमी 60% लोकानीं लस घेतल्यानंतरच लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल असे डॉक्टरांचे मत

0
77

गोव्याच्या सर्व लोकांमध्ये कोविड रोगाची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास अजून खूप वेळ आहे.मंगळवारी फक्त ६% लोकांचे लसीकरण झाले आहे. अजूनही ४५ वयोगटातील लोक लसीकरण घेण्यास उत्सुक असल्याचे दिसत नाहीय.गोवा आणि आसपासच्या गावामध्ये बुधवारपासून आरंभ झालेल्या १० दिवसांच्या लसीकरण उत्सवात
जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याचा उद्देश आहे.

जास्तीत जास्त लोकांनी लसीकरणाचा लाभ घेणे आवश्यक आहे.तरच लोकांमध्ये सार्वजनिक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यास मदत होईल .ज्वलजवळ ६०% लोकांचे लसीकरणाचे दोंन्ही डोस पूर्ण झाले तरच सार्वजनिक रोगप्रतिकार शक्ती निर्माण होऊ शकेल असे गोवा मेडिकल कॉलेजच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागाचे प्रमुख डॉ .काकोडकर यांनी सांगितले

बुधवारी आरोग्यविभागाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार ९५,८८६ लोकांचे लसीकरण झाले आहे आणि ३,००,९३२ लोकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. आता पुढच्या १५ दिवसात पावसाळा सुरुवात होईल आणि त्यामुळे लोकही घराबाहेर पडत नाहीत.म्हणून हे १० दिवस असर्वांसाठीच अतिशय महत्वाचे असून प्रत्येकाने त्याचा फायदा घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक लसीकरणाचे काही दुष्परिणाम असतातच पण कोविडमुळे लसीकरण झाले असल्यास जास्तीच्या मोठ्या आजारपणाला सामोरे जावे लागत नाही असेही ते म्हणले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here