गोवा राज्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूंची संख्या वाढतच आहे. गोव्यामध्ये १०५५ रुग्ण पोझीतीव्हयालें असून ३४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाचे ऍक्टिव्ह १५००० लोक आहेत.
समाधानाची बाब म्हणजे १३९६ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत त्यामुळे रिकव्हरी रेट हा ८८ % झाला आहे. कोरोनामुळे आजपर्यंत गोव्यामध्ये एकूण मृत्यू २५७१ झाले आहेत. कोरोना संसर्गाने संक्रमित झालेले अत्यवस्थ रुग्ण रुग्णालयात येतच आहेत.काही रुग्ण लक्षणे जास्त झाल्यावर दाखल होत आहेत.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सर्व नागरिकांना लक्षणे दिसताच कोरोनाची चाचणी करून औषधोपचार घ्यावे आणि कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास लागेचच उपचार सुरु करण्याची विनंती केली आहे.त्यांनी कालच एक रुग्ण ऑक्सिजनची पातळी ८०% पेक्षा खाली गेल्यावर रुग्णालयात दाखल होण्यास आला होता असेही सांगितले आहे.
शुक्रवारी नावेलीम येथील ६९ वर्षांचा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास आणले असता तो मृतावस्थेत असल्याचे दिसून आले तर ६ रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच झाला आहे.मृतांपैकी ३५ वर्षांचा फोन्डा येथील तरुण अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात आणण्यात आला होता त्याशिवाय त्याची कोरोनाची चाचणीही करण्यात आलेली नव्हती. यामध्ये १८रुग्णांचे मृत्यू जीएमसी मध्ये झाले असून,१० साऊथ गोवामध्ये एसजीडीएच मध्ये झाले आहेत तर चार खाजगी रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे