गोवा राज्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर नव्या शैक्षणिक वर्षासाठी कृती आराखडा तयार करण्याचे दिगंबर कामत यांनी आवाहन केले आहे. त्याशिवाय सर्व शाळा आणि कॉलेज हे सध्या ऑनलाईन सुरु असल्याने गोव्याची इंटरनेट कनेक्टिव्हीटी चांगली करावी अशीही मागणी त्यांनी गोवा सरकारकडे केली आहे. एनएसयूआयने १२वी च्या परीक्षा सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यावरच घ्याव्या असे मत व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या महामारीच्या संक्रमणाची लाट येत्या सप्टेंबरपर्यंत लहान मुलांना होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या लाटेशी सामना करण्याचे सर्व आराखडे आखून त्याप्रमाणे आरोग्यव्यवस्था तयार ठेवणे तसेच शिक्षण पद्धतीतही सुधारणा करून अद्यावत करणे त्यासाठी विविध स्तरावरील तज्ञांना विचारून व्यवस्था करावी असे कामत यांनी सांगितले