गोवा: मागील आठवड्यात झालेल्या मृत्यूपैकी 87% लोक हे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असून त्यांचे लसीकरण झालेले नव्हते.

0
109

गोव्यामध्ये मागील आठवढ्यात मृत्यू पावलेल्या कोविडच्या रुग्णामधील सर्वजण ४५ पेक्षा जास्त वयाचे होते.त्याशिवाय त्यांचे लसीकरणही झालेलं नव्हते. यातील १५७ लोकांनी लसीकरणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसूनही पहिला डोसही घेतला नव्हता. तर फक्त १५ लोकांनी पहिला डोस घेतला होता असे कोविड वॉर्डमध्ये काम करण्याऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

त्याशिवाय २लाख लसीकरणाचे डोस सध्या उपलब्ध आहेत पण लोक लसीकरण करण्यास येत नाहीत असेही त्यांनी सांगितले. जर कोविडचे लसीकरण पूर्ण घेतले म्हणजे दोन्ही डोस जे रुग्ण घेतील त्यांना कोविडमुळे गम्भीर स्वरूपाचा आजार होणार नाही असे इंडिअन मेडिकल असोसिएशनचे, गोवा येथील अध्यक्ष डॉ.विनायक बुवाजी यांनी सांगितले. आपल्याला जर ६०-७०% कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण घेऊन येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहावे असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here