गोवा राज्यातून NEET परीक्षेला ३००० पेक्षा जास्त मुलांचा सहभाग

0
117

गोवा: गोवा राज्यातील १५ केंद्रामध्ये ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली असून त्यामध्ये ८८२ मुले आणि २४८३ मुलींनी परीक्षा दिली आहे.एकूण विद्यार्थ्यांची ९५% उपस्थिती होती.

प्रत्येक केंद्रावर कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले गेले होते.केंद्रावर येणाऱ्या प्रत्येकाला मास्क बांधणे बंधनकाकारक होते. परीक्षेचा कालावधी हा दुपारी २ ते ५ होता. विद्यार्थी सकाळी ११ पासूनच केंद्रावर उपस्थित होते.मात्र काही विद्यार्थ्याना मुसळधार पावसामुळे केंद्रावर येण्यास थोडा उशीर झाला होता.परंतु दुपारी १.५५ नंतर आलेल्या विद्यार्थ्यांना मात्र नियमाप्रमाणे परत पाठवण्यात आल्याचेही सांगण्यात आहे.

एका वर्गात फक्त १२ विद्यार्थ्याच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.सर्वात लहान केंद्रावर २५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर मोठ्या केंद्रावर एका वेळी ६६० विद्यार्थ्यानी परीक्षा दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here