गोवा सरकारने कर्फ्यू 7 दिवसांपर्यंत वाढविला

0
112

गोवा सरकारने राज्यात कर्फ्यू 7 दिवसांपर्यंत म्हणजे १४ जूनपर्यंत वाढविलाआहे.पण त्यातील नियम थोडे कमी करण्यात आले आहेत. कर्फ्यूचे निर्बंध वाढविताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे कि आवश्यक वस्तूंची दुकाने ४ वाजेपर्यंत उघडी राहतील.तसेच पावसाळी वस्तूंची आणि रिपेरिंग,घरबांधणीची कामे करणारी दुकाने उघडी राहतील.

शनिवारी गोव्यात कोविड -१९ चे ५६७ नवीन रुग्ण आढळून आले असून १७ मृत्यूंची नोंद झाली आहे.राज्यातील कोविडच्या रुंगांचा आणि मृत्यूचा रेट कमी होताना दिसत आहे. शनिवारपर्यंत ८२१६ लोक कोविड बाधित झाले आहेत.

कोविड कर्फ्यूमध्ये घरगुती सामानाची ,मद्याची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत उघडी होती. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेतील औषधदुकाने आणि हॉटेलमधील जेवणाची पार्सल सेवा संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उघडी आहेत. सरकारने आपली कार्यालये उघडण्यास परवानगी दिली आहे तर वरिष्ठ महाविद्यालये आता ऑनलाईन शिकविन्यास सुरुवात करणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here