आज सकाळी ७ वाजता गोवा सरकारने डेल्टा व्हेरिएंटमुळे ५ जुलै पर्यंत निर्बंध वाढवले असल्याचे जाहीर केले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या बॉर्डरवर कोविड तपासणी प्रक्रिया वाढविण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. शेजारील राज्यातून या डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण आला तर त्यामुळे रक्त तपासणी प्रयोगशाळांमध्येही सदर तपासणी संदर्भात सूचना देण्यात आले आहेत.
शेजारील राज्याच्या जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण सापडला असल्यामुळे आम्ही गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविडची तपासणी केली जात आहे. त्यातून जर ते कोविड पॉझिटिव्ह आले तर अशा लोकांना कोविड रुग्णालयात अथवा विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात डेल्टा व्हेरिएंटचे २० रुग्ण सापडले आहेत आणि त्यातील एक रुग्ण सिंधुदुर्गात सापडला असला तरी अजून एकही डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण गोव्यात सापडलेले नाही आहे. आम्ही गोव्याच्या प्रत्येक बॉर्डरवर आम्ही प्रत्येकाची कसून तपासणी करत आहोत. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाला या सर्वाचा त्रास होत असला तरी गोव्यातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्यासाठी कोविड तपासणी महत्वाची आहे.राज्यात कोविडमुक्त झालेले एकूण १,५९,९५४ रुग्ण आहेत. शुक्रवारी २७७ रुग्ण घरी घेणे आहेत.राज्यात कोविडचे २७७७ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत .