गोवा सरकारने सोमवारी गोव्याच्या मुंबई कोर्टात तेथील लोकसंख्येच्या ४५% नागरिकांना कोरोनाच्या लसीकरणाचा पहिला डोस दिला असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
एडवोकेट पांगम यांनी हा अहवाल सादर करताना सांगितले कि या लसीकरणामध्ये १८-४४ या गटातील लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे लसीकरणाला चांगलाच वेग आला आहे.परंतु वरिष्ठ वयोगटातील नागरिकांचा प्रतिसाद फारच कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकात अजूनही बऱ्याच जणांचे लसीकरण झालेले नाही.
या लसीकरणासाठी गोव्यात कायमस्वरूपी ४० केंद्र उभारण्यातआली असून १९५ उपकेंद्र उघडण्यात आली आहेत.यासाठी त्या त्या भागातील कार्यकर्ते,नेते आणि रुग्णालयांतील डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने या केंद्रात लसीकरण सुरळीत चालू आहे.नागलीकांनी या लसीकरणास चांगला च प्रतिसाद दिला असून गेल्या तीन दिवसात १७,००० लोकांचे लसीकरण झाले आहे.