गोव्यात ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू

0
93

गोव्यात कोरोनाचा संसर्ग अचानकच वाढ झाली आहे.गोव्यातील आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. यामुळे ऑक्सिजनची समस्या निर्माण झाली . मंगळवारी 26 रुग्णांचा तर बुधवारी 21 रुग्णांचा मृत्यू झाला, गुरुवारी 13 आणि आता शुक्रवारी पुन्हा आठ रुग्ण दगावल्याची घटना समोर आली आहे.

या घटनांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाने म्हटले आहे.उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हंटल आहे की, आमच्यासमोर जी कागदपत्रे ठेवण्यात आलीत त्यावरून स्पष्ट होतंय की, रुग्ण अक्षरशः तडफडतायत. केवळ ऑक्सिजनच्या अभावामुळे त्यांना प्राण गमवावे लागत आहेत.ऑक्सिजनसाठी महाराष्ट्र आणि इतर राज्यांवर अवलंबून असलेल्या गोव्यात सध्या 26 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजन पुरवठा मंजुर करण्यात आला आहे.

त्यातला जवळपास 40 टक्के साठा हा कोल्हापूरातून जात आहे. आता हा साठा दुप्पट करण्याची मागणी गोवा सरकारने केंद्राकडे केली आहे.ॲाक्सिजन पुरावठ्या अभावी रुग्णांचे मृत्यू होत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यात चांगलाच वाद सुरु आहे.

रुग्णालयात मृत्यू होत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः गोवा मेडिकल कॉलेजमध्ये बसले आहेत .गोव्यामध्ये अजूनही लसीकरण झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here