देशभरात चाललेले कोरोनाचे थैमान कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. महाराष्ट्रात लागू झालेले कडक लॉकडाऊन त्यामुळे चित्रीकरणावर आलेली बंदी यामुळे अनेक हिंदी आणि मराठी वाहिन्यांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करण्याचा तोडगा काढला होता. त्यामुळे अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण गोव्यामध्ये सुरु होते.हळूहळू कोरोनाने गोव्यामध्येही संक्रमण सुरु झाले आणि दिवसेंदिवस गोव्यातही कोरोनाचे रुग्णाला हजार पटीने वाढू लागले.
याच पार्श्वभूमीवर आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव येथे रविंद्र भवन येथे सुरु असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या सेटवर गोंधळ घालत शूटिंगला विरोध दर्शवला होता. चित्रीकरणा -मुळे फातोर्डा आणि मडगाव या भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात नसल्याचेही त्यांचे म्हणणे होते.त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी घातली आहे.त्याशिवाय रविंद्र भवनमध्ये कोरोना चाचणीसाठी लॅब सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे