गोव्याला वादळाचा मोठा फटका

0
120
Goa Cyclone Toukte

तौक्ते वादळाचा फटका अखेरीस गोवा आणि महाराष्ट्राला बसला आहे. रविवारी सकाळी हे वादळ गोव्यात धडकलं ज्यानंतर महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर या वादळाने धडक दिली. सकाळपासून गोव्यात ढगाळ वातावरण तयार झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून गोव्याचा समुद्रकिनारा आणि महत्वाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना जमण्यास बंदी घातली आहे.

गोव्यातल्या अनेक रस्त्यांवर झाडं कोसळून रस्त्यावरील वाहतूक देखील बंद झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लावलेले खांब कोसळून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्यात ताशी ७० ते ८० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ज्याचा फटका गोव्याला बसला आहे.. गोव्यातील महत्वाच्या शहरांत पोलिसांनी बंदोबस्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here