ग्रामपंचायतींना विलगीकरण कक्षाच्या उभारणी खर्चास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित निधीमधून मान्यता

0
72


सिंधुदुर्गनगरी, दि. 26 – कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न चालूच आहेत.आता कोरोनाचा संसर्ग गावागावात पोहचू लागला आहे. या पार्श्वभूमीवर गावागावात कोविड रुग्णांसाठी सोयी -सुविधा देण्याचे पत्रक ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रविण जैन यांनी काढले आहे.

यामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांच्या विलगीकरण कक्षाची मागणी एखाद्या ग्रामपंचायतीने केल्यास, अशा कक्षास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित (untied) प्राप्त निधीच्या २५% च्या मर्यादेत खर्च करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन परिपत्रक ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रविण जैन यांनी काढले आहे.

२५ मे रोजीच्या या परिपत्रकात म्हटले आहे, कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये अर्सेनिक अल्बम-३० हे होमिओपॕथिक औषध ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन देणे, जिल्हा परिषदांना रुग्णवाहिका पुरविणे, जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास वारसांना दिलासा देण्यासाठी 50 लाखाचे विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारणीबाबत योग्य ते नियोजन करावे. त्याबाबतचा आढावा घेवून संबंधित ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित(untied) निधीमधून खर्च करण्यास त्वरित मान्यता द्यावी असेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here