चक्रीवादळानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू

0
93
ratnagiri toukte cyclone
तौक्ते चक्रीवादळातील वंचित नुकसानग्रस्तांना अनुदानाची रक्कम

तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 132.11  मिमी तर एकूण 1189  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.   मंडणगड 52 मिमी , दापोली 82 मिमी, खेड 49 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 142 मिमी, रत्नागिरी 274 मिमी, राजापूर 208 मिमी, लांजा  तालुक्यामध्ये 162 पावसाची नोंद झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांचेकडून तोक्ते चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानीबाबतची  प्राथमिक माहिती (12 वाजेपर्यंत) पुढीलप्रमाणे आहे.

मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यात 1028 घरांचे तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे.  या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1,  संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या असून गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वर मध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत.  जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

वादळामुळे राजापूर तालुक्यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले.  सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.

1 एकूण गावे 1239 पैकी 760 बंद 479 सुरू,2 एकूण उपकेंद्रे 55 पैकी 27 सुरू 28  बंद,3.ट्रान्सफॉर्मर 7548 पैकी 1883 सुरू 5665 सुरू होणे बाकी,4.एकूण वीज कनेक्शन 545120 पैकी 187711 सुरू 357409 सुरू होणे बाकी,5.HT पोल 164 बाधित,6.LT पोल 391 बाधित,7.HT लाईन नादुरुस्त 49 किलोमीटर,8.LT लाईन नादुरुस्त 117 किलोमीटर,9.ट्रान्सफॉर्मर 15 नादुरुस्त,10मनुष्यबळ, कंपनी चे 71 माणसे 910, कंत्राटी 33 टीम माणसे 304 वरील माहिती आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार आहे. यात आणखी वाढ होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here