प्रतिनिधी पांडुशेठ साठम
भगवती माध्यमिक शाळा कोटकामते या शाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा शालेय गटात शिरगाव हायस्कूल शिरगाव ची विद्यार्थीनी कुमारी स्वराली सागर मेने इयत्ता 7 वी अ हिने उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. तिला स्मुती चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रू 500/ देण्यात आले. कोविड 19 च्या नियमामुळे पारितोषिक वितरण समारंभ न करता शाळा स्तरावर बक्षिसे वाटप करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री संभाजी साटम साहेब , अधीक्षक मा.श्री रवींद्र जोगल साहेब,माझी मुख्याध्यापक मा. श्री एस व्ही मुळे सर यांच्या उपस्थितीत शाळा कार्यालयात स्वराली मेने हिला पारितोषिक देण्यात आले.