चिनचे एक मोठे रॉकेट पृथ्वीच्या वातावरणामध्ये अनियंत्रितपणे परत येत आहे परंतु ते पृथ्वीवर कोठे पडणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

0
106

चिनी रॉकेट पृथ्वीवर कोसळत आहे? होय, आणि “हे संभाव्यत: चांगले नाही,” हार्वर्ड विद्यापीठाच्या अ‍ॅस्ट्रोफिजिक्स सेंटरचे अ‍ॅस्ट्रोफिजिकल जोनाथन मॅकडॉवेल यांनी गार्डियनला सांगितले.चीनने अंतराळामध्ये स्पेस स्टेशन बनवण्याचे योजले आहे. या योजनेअंतर्गत वेनचांग येथे गुरुवारी स्थानिक वेळेनुसार टी-आकाराच्या चिनी अवकाश यानाचा काही भाग लॉन्च केला आहे .

परंतु या “लाँग मार्च 5 बी रॉकेट” च्या मुख्य टप्प्यातून विभक्त झाल्यानंतर नियोजित भागात न पडता म्हणजेच समुद्रात न पडता पृथ्वीवर पडणार आहे आणि ते कुठे पडणार आहे याबद्दल चीन किंवा कोणत्याही अंतराळ शास्त्रज्ञांना माहिती नाही आहे असे स्पेस न्यूजने सांगितले आहे. कोर टप्पा अंदाजे 18,000 मैलांचा प्रवास करीत आहे आणि दर 90 मिनिटांनी किंवा एकदा पृथ्वीभोवती वळत आहे. पृथ्वीच्या वरच्या वातावरणाच्या जवळ येताना त्याची कक्षा हळूहळू क्षीण होत आहे, म्हणजे ती उंचीमध्ये कमी होत आहे आणि मंद होत आहे “ अंतराळ यानाच्या परत येणाऱ्या भागांचे अनियंत्रितपणे येण्याची सर्वात मोठी घटना असेल आणि संभाव्यत: ते एखाद्या वस्तीच्या भागावर पडणार आहे ,” असे स्पेस न्यूजने सांगितले आहे.

ते म्हणाले की, पृथ्वीवरील सागरासारख्या निर्जन ठिकाणी या यानाचा कोर टप्पा पडण्याची अधिक शक्यता आहे. या पडणार्‍या रॉकेट स्टेजचा मार्ग स्थिर करणे कठीणच नव्हे, तर अशक्य आहे. पृथ्वीचे वातावरण, सौर क्रियाकलाप यामुळे या यानाचे अनियंत्रित भाग कधी व कोठे खाली पडणार आहेत याचा अंदाज करणे कठिण आहे.स्पेसन्यूज म्हणाले की, “२३ टन (21 मेट्रिक टन ) वजनाचा भाग हा पृथ्वीवर या आठवड्याच्या शेवटी मनुष्यवस्तीवर कदाचित आदळण्याची श्यक्यता आहे . अशा प्रकारची घटना चायनासाठी काही पहिली घटना नाही आहे.

वर्षभरापूर्वी चायनाच्या पहिल्या यानाचा १० मीटर लांबीचा लोखंडी भाग आफ्रिकेत काही घरांवर येऊन कोसळला होता.पण त्यामध्ये कोणालाही दुखापत अथवा जीवित हानी झाली नाही ही सुदैवाची गोष्ट.पण यावेळी यानाचे पृथ्वीवर येत असलेले भाग हे बहुतांशी लोकवस्तीच्या दिशेने येत आहेत. अमेरिका,चिली ते ऑस्ट्रेलिया या भागात हे तुकडे पडणार असल्याची श्यक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु यातील ७०% भाग हे समुद्रात कोसळतील अशी अपेक्षा आहे. बहुतेक वेळा कोसळणारे भाग हे पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर जळत येतात आणि अगदी फारच मोठे तुकडे जमिनीवर पडतात.

जेव्हा ते पृथ्वीच्या कक्षेत येतील तेव्हाच ते कुठे पडतील याचा अंदाज घेता येईल. कारण त्यावेळी इन्फ्रारेड टेलिस्कोप मधून पडणाऱ्या यांच्या उष्णतेच्या लाटा टेलिस्कोप मोजू शकेल. परंतु कुणी यानाचे पडणारे भाग बघितले तरी त्यांना हात लावू नका.ताबडतोब पोलिसांना कळवा आणि अशा तुकड्यांमधून कधी कधी रेडिएशन बाहेर पडत असतात. त्याशिवाय कोणतीही प्रॉपर्टी अथवा जीवितहानी झाल्यास त्यासाठी चायना जबाबदार राहणार आहे.तसे पहिले तर स्पेसमधून कधीकधी काही टाकाऊ भाग पृथ्वीवर पडतात पण २० टन वजनाचा भाग कोणत्याही नियंत्रणाशिवाय पृथ्वीवर पहिल्यांदाच अशाप्रकारे आदळत आहे असे स्पेसफ्लाइट निरीक्षक आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेलने यांनी सांगितले आहे.

23People Reached4EngagementsBoost Post

33

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here