चिपी विमानतळाबाबत खा. विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यास केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांचा पत्राद्वारे प्रतिसाद- आमदार वैभव नाईक यांची माहिती

0
75

प्रतिनिधी – पांडुशेठ साटम

चिपी विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी खासदार विनायक राऊत करत असलेल्या पाठपुराव्याला केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २० जुलै २०२१ रोजी खा.राऊत यांना पत्र पाठवून प्रतिसाद दिला आहे. या पत्रामध्ये त्यांनी चिपी विमानतळाच्या कार्यवाही बाबत माहिती दिली आहे.

चिपी विमानतळाचे काम गेली ५ ते ६ वर्षे रखडले होते. परंतु खासदार विनायक राऊत यांनी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून विमानतळाचे काम गतीने करून घेतले. ६ महिन्यापूर्वी DGCA समितीने चिपी विमानतळाची पाहणी केल्यांनतर सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाच्या धावपट्टीबाबत त्रुटी काढल्या होत्या. त्याबाबत देखील खा. विनायक राऊत यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई व एमआयडीसीचे अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून विमानतळ विकासकाकडून नवीन धावपट्टी करून घेण्यात आली.

आता या विमानतळाला DGCA समितीची परवानगी लवकरच मिळेल. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार विनायक राऊत यांना पत्र लिहून प्रतिसाद दिला आहे. चिपी विमानतळाला परवानगी मिळाल्यानंतर विमानतळ कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रामध्ये दिली आहे. येणाऱ्या आठ दिवसात DGCA समितीची परवानगी घेऊन लवकरच विमानतळ सुरु करण्यासाठी खा. विनायक राऊत प्रयत्नशील आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here