चीन विरुद्ध अमेरिका संघर्ष पेटणार?

0
97

करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.कोरोनाचे लसीकरण झाल्यावरही सगळ्याव देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाकडून यासंदर्भातील महत्वाची माहिती लपवून ठेवली जात असल्याचा आरोप अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला आहे. चीनवर करोनासंदर्भातील माहिती उघड करण्यासाठी दबाव निर्माण व्हावा म्हणून अमेरिका आपल्या सहकऱ्यांसोबत काम सुरु ठेवणार असल्याचं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलं.

 “आजपर्यंत पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाने पारदर्शकपणे माहिती देण्यास नकार दिलाय. तसेच करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाही त्यांनी माहिती लपवून ठेवलीय,” असं बायडेन म्हणाले आहेत. यापूर्वीचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनीही अनेकदा चीनच करोनाच्या प्रादुर्भावासाठी जबाबदार असल्याचे आरोप केलेत. मात्र प्रत्येक वेळेस चीनने हे आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यामुळेच आता बायडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनकडून उत्तर दिलं जाईल असं सांगितलं जात असून पुन्हा एकदा करोनावरुन या दोन महासत्ता आमने-सामने येण्याची चिन्हं दिसत आहेत.

अमेरिकन गुप्तचर कम्युनिटीने काढलेल्या निष्कर्षाप्रमाणे तपासामध्ये सहभागी होण्याची तसेच माहिती देण्याची चीनची इच्छा दिसत नसून यामधून आंतरराष्ट्रीय समुदायासहीत काम करण्यास करोनाची उत्पत्ती झालेला देश उत्सुक नसल्याचं दिसत आहे. चिनी अधिकाऱ्यांना या विषाणूबद्दल आधीपासूनच माहिती असल्याचं अमेरिकन तज्ज्ञांना वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here