महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. ही एकजूट सर्व थरांमध्ये आणत कोरोनाला हरवायचंय आणि यातील तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना केले.शासनाने जम्बो कोविड सेंटर्स उभारले आहेत त्यातील काही खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन करतानाच या सेंटरमध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा राऊंड झाल्यास उपचारात मदत होईल आणि लोकांच्या मनात या सेंटर्सविषयी असलेली भावना दूर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व नामांकित खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी आणि तज्ज्ञांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला