जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु करावे – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे

0
77

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधन व प्रशिक्षणामध्ये काळानुरूप बदल करून नावीन्यपूर्ण संशोधन करावे, संशोधनाची व्याप्ती वाढवावी, प्रशिक्षण देताना ज्याप्रमाणे अमेरिका, चीन देशांमध्ये कौशल्य विकासाकरिता प्रशिक्षणे राबविले जातात. त्याचधर्तीवर जागतिक दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण बार्टी मार्फत सुरु केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बार्टीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, दिव्यांग कल्याण आयुक्त श्री. ओमप्रकाश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

रदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी राज्य शासनामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते आणि यावर्षी सामाजिक न्याय विभागामार्फत सर्वच्या-सर्व 75 विद्यार्थ्याच्या जागा भरलेल्या आहेत. त्यात यावर्षी पन्नास विद्यार्थ्यांची वाढ करत सव्वाशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे आणि आगामी काळात ही संख्या दोनशे पर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने पुण्यात सैनिकी शाळा सुरु करण्याकरिता प्रयत्नशील आहोत असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांकरीता आणखी स्वाधार योजनेत बदल करण्यात येऊन तालुका स्तरावरील विद्यार्थी यांनाही त्याचा लाभ घेता येईल. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. त्यामुळे पुणे येथे आणखी दोन वसतीगृह उभारणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यूपीएससी व एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. बार्टीने मदत केल्यामुळे आम्ही अधिकारी झालो असल्याचे सांगून त्यांनी बार्टीसाठी व समाजासाठी सोबत राहू असे सांगून आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here