दिल्ली- केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात जानेवारी 2023 पासून वाढ करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे सेव्हिंग स्कीमवरील व्याजदर 0.20 टक्के ते 1.10 टक्के वाढवण्यात आल्याची माहिती अर्थखात्याने दिली असल्याचे सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी सांगितले आहे.
सरकारने नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस मुदत ठेव (POST OFFCE DEPOSITS) जेष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात मोठी वाढ केली असून सदर व्याजदर माहे जानेवारी 2023 पासून लागू झालेले आहेत. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरिल व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना “न्यू ईयर” गिप्ट दिले आहे. किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ करण्यात आलेली असून 7 टक्क्यांवरुन 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच किसान विकास पत्राच्या माध्यमातून केली जाणारी गुंतवणूक आता 120 महिन्यातच दुप्पट होणार आहे.
जेष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरातही वाढ करण्यात आलेली असून आता या योजनेकरिता 7.6 टक्क्यांवरुन 8 .0 टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. बचत ठेव 4 टक्के, एक वर्षाच्या ठेवीसाठी 5.5 टक्क्यांवरुन 6.6 टक्के इतकी वाढ केली आहे. दोन वर्ष ठेवीसाठी 5.7 टक्क्यांवरुन 6.8 टक्के इतकी वाढ केली. तीन वर्ष ठेवींसाठी 5.8 टक्क्यांवरुन 6.9 टक्के इतकी वाढ केली आहे. पाच वर्ष ठेवींसाठी 6.7 टक्क्यांवरुन 7 टक्के इतकी वाढ केली आहे. मासिक उत्पन्न योजनेसाठी 6.7 टक्क्यांवरुन 7.1 टक्के वाढ केली आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेसाठी 6.8 टक्क्यांवरुन 7 टक्के इतकी वाढ केली आहे. तर पब्लिक प्राव्हिडंट फंडचे व्याजदर 7.1 व सुकन्या समृध्दी योजनेचे व्याजदर 7.6 टक्क्यांवर कायम आहेत. 75 हजार नवीन खात्यांचा टप्पा पार केला आहे तर पोस्टल विम्यात 3 कोटीची गुंतवणूक झाली आहे.
सिंधुदुर्ग विभागाने चालू आर्थिक वर्षात 75,000 खात्यांचा विक्रमी टप्पा पार केला आहे. पोस्ट विभागाच्या पोस्टल विमा योजना (PLI, RPLI) सुकन्या योजना अशा सर्वच योजना लोकप्रिय असून या सर्वच योजनांमधील सिंधुदुर्ग विभागाची कामगिरी गोवा क्षेत्रीय कार्यालयात अव्वल ठरलेली आहे. पोस्टल विमा योजना, सुकन्या योजना PPF, NSC या योजनांवर प्राप्ती करात सवलत असल्याने, नोकरदार वर्गाने या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच दिनाक 9 ते 10 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुकन्या समृध्दी योजना खाती उघडण्याच्या अनुषंगाने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी शुन्य ते दहा वयोगटातील मुलींना या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सिंधुदुर्ग विभागाचे डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे.