जगातील सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्था असलेल्या जी-७ देशांनी चीनविरोधात एकत्र यावे आणि विकसनशील देशांसाठी चीनला पर्याय ठरू शकेल अशी पर्यायी पायाभूत सुविधा निर्माण करावी, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स या देशांनी बायडेन यांनी चीनविरोधात पर्यायी पायाभूत विकास आघाडी तयार करण्याच्या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. मात्र,जर्मनी, इटली,युरोपीय समुदाय यांनी याबाबत खुलेपणा दाखवला नाही.
दहशतवाद, अधिकारवाद आणि आर्थिक जुलूम या विरोधात भारत ‘जी- ७’ राष्ट्रांचा एक नैसर्गिक सहकारी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. करोना साथीचा जागतिक मुकाबला करण्यासाठी लशींच्या पेटंटवरील संरक्षण उठवावे, त्याचबरोबर ‘एक वसुंधरा, एक आरोग्य’ हा दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन मोदी यांनी केले.