अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस शनिवारी तिस-यांदा ईडी (अंमलबजावणी संचालनालय)च्या चौकशीला गैरहजर राहिली. तिहार कारागृहातून 200 कोटी रुपये वसूल करणारा सुकेश चंद्रशेखर आणि लीना पॉल प्रकरणी जॅकलिनला ईडीच्या चौकशीला हजर रहावे लागणार लागणार होते. यापूर्वी 25 सप्टेंबर रोजी देखील जॅकलिन गैरहजर होती.
शुक्रवारी जॅकलिनने पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावण्याची विनंती केली आहे.30 ऑगस्ट रोजी जॅकलिनची दिल्लीत सहा तास चौकशी करण्यात आली होती. सुकेशने दिल्लीच्या तिहार कारागृहातून नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. 200 कोटींच्या खंडणीचा मुख्य आरोपी सुकेश तिहार कारागृहातून अभिनेत्री जॅकलिनला फोन करायचा. सुकेश तिहार कारागृहातून कॉल स्पूफिंग सिस्टीमद्वारे अभिनेत्रीला फोन करायचा. पण त्याने आपली ओळख उघड केली नाही. एजन्सींना सुकेश चंद्रशेखरचे महत्त्वाचे कॉल डिटेल्स मिळाले आहेत. याद्वारे तपास यंत्रणांना जॅकलिनसोबत झालेल्या फसवणुकीची माहितीही मिळाली. सुकेश या प्रकरणातील मास्टर माइंड असून तो वयाच्या 17 व्या वर्षीपासून गुन्हेगारीत सामील आहे.