जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस व्हॅक्सीनला केंद्र सरकारची आपत्कालीन मंजुरी

0
111

भारतात आता अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सिंगल डोस व्हॅक्सीनला आपत्कालीन मंजुरी केंद्र सरकारने दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सिंगल डोस व्हॅक्सीनला जगभरातील अनेक देशात मान्यता मिळाली आहे. या लसीचे वैशिष्ट्य म्हणजे ही एक सिंगल डोस व्हॅक्सीन आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस व्हॅक्सीन गंभीर लक्षणांपासून संरक्षण करण्यास 85 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. कंपनीने 5 ऑगस्ट रोजी आपत्कालीन मंजुरीसाठी परवानगी मागितली होती. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी या लसीला आपत्कालीन परवानगीसाठी मंजुरी दिली आहे.

भारतात लसीचे उत्पादन हैदराबाद येथील कंपनी ‘बायोलॉजिकल इ’ करणार आहे. ही एक सिंगल डोस व्हॅक्सीन आहे. या लसीला डब्ल्यूएचओकडून मान्यता मिळाली असून सध्या 59 देशात याचा वापर केला जात आहे.’बायोलॉजिकल ई’ ही कंपनी दरमहा सुमारे 70 कोटी डोस तयार करु शकते. ही एक व्हायरल वेक्टर लस असून कोव्हिशिल्डसारखी आहे. आपल्या शरिरातील सेलपर्यंत अँटीजन पोहोचवण्यासाठी एका व्हायरसचा वापर केला जातो. या लसीमध्ये कोरोना व्हायरसची जीन्स अॅडेनोव्हायरसमध्ये मिसळून तयार केली गेली आहेत. ही पेशी आपल्या शरीरात स्पाइक प्रथिने बनवते. ही प्रथिने नंतर रोगप्रतिकारक शक्तीला व्हायरसशी लढण्यास मदत करतात. केंद्र सरकारने परवानगी दिलेली ही लस 5 वी असून यामध्ये कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक-व्ही आणि मॉडर्ना या लसींना मान्यता देण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here