हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
सत्तरच्या दशकांतील ‘परिचय’, ‘आंधी’, ‘खुशबू’, ‘मौसम’ अशा गुलजार यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. नंतरच्या काळातही एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा तत्सम भूमिकेतून त्यांचे दर्शन व्हायचे. दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिके त त्यांनी साकारलेली आर्य सुमंत ही भूमिका त्यांनी साकारली होती.