ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईतील खारमधल्या पी डी हिंदूजा रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. 29 जून रोजी रात्री पुन्हा एकदा श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
98 वर्षीय दिलीप कुमार यांना मागील महिन्यात 6 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हात्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.