टाटा समूह तीन महिन्याचा नफा गुंतवणार आरोग्य यंत्रणेसाठी

0
83

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस फैलावत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नाही आहे. देशातील आरोग्य यंत्रणा कमकुवत पडत आहे. पण कोरोनाच्या या महामारीला लढा देण्यासाठी टाटा समूहाच्या कंपन्या हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण या गोष्टी सहजरित्या शक्य करण्यासाठी काही रक्कम गोळा करत आहेत.टाटा समूहाच्या या कोविड क्रिटिकल केअर इन्फ्रास्ट्रक्चरमुळे वैद्यकीय यंत्रणा मजबूत होण्यास मदत होईल. केवळ सरकारी रुग्णालयांवर रुग्णांचा व इतर गोष्टींचा भार येणार नाही.

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या पुढाकाराने ‘नो लिमिट’ (अमर्यादित) मदतीची एक योजना आखली आहे.इकोनॉमिक टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार टाटा समूह या योजनेसाठी तब्बल 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात टाटा समूहाचा जो नफा झाला त्याच रकमेतून 2000 कोटी रुपये टाटा समूह गुंतवत असल्याची माहिती आहे.रतन टाटा हे नेहमीच संकटातील लोकांना मदत करण्यासाठी पुढे येतात, टाटा समूह हा नेहमीच अशा मोठ्या संकटवेळी संपूर्ण देशाला मदत करण्यासाठी तत्पर असतो, कोरोनाचं संकट ओढवल्यापासून रतन टाटा यांनी विविध पद्धतीने लोकांपर्यंत आपला मदतीचा हात कायम पोहोचेल याची काळजी घेतली आहे. आता टाटाने आखलेल्या या ‘नो लिमिट’ योजनेचा गरजूंना मोठा आधार मिळणार आहे.

188People Reached19EngagementsBoost Post

332 SharesLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here