टोकियो: पहिल्या ऑलिम्पिकमध्येच देशासाठी नीरज चोप्राने जिंकले पहिले अ‍ॅथलेटिक्स गोल्ड मेडल

0
98

हरियाणाच्या नीरज चोपडा टोकियो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये देशासाठी पदक जिंकणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. हे त्याचे पहिले ऑलिम्पिक आहे. यापूर्वी, तो पूल A पात्रतेमध्ये 86.65 मीटर थ्रोसह प्रथम आला होता. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो (88.07 मी) आहे.

पदक जिंकल्यानंतर हरियाणाच्या पानिपत येथे राहणाऱ्या नीरजने म्हटले की, ‘मी माझे सुवर्णपदक महान मिल्खा सिंह यांना समर्पित करतो. ते मला स्वर्गातून बघत असतील. मला पदकासह मिल्खा सिंह यांना भेटायचे होते. 

नीरज अचानक या गेममध्ये आला. त्याने जिम सोडली आणि भाला फेकण्यास सुरुवात केली. त्याचे काका भीम चोपडा यांनी सांगितले की, नीरज सुरुवातीला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नव्हता, त्यामुळे तो जिमला जायचा. जिम जवळ एक स्टेडियम होते, त्यामुळे अनेक वेळा तो तिथे फिरायला जायचा.

एकदा काही मुले स्टेडियममध्ये भालाफेक करत होती. नीरज तिथे उभा राहिला आणि मग प्रशिक्षक त्याला म्हणाले की ये भाला फेकून दाखव, बघू किती दूर फेकू शकतोस. नीरजने भाला फेकला, मग तो खूप दूर पडला. यानंतर प्रशिक्षकाने त्याला नियमित प्रशिक्षणासाठी येण्यास सांगितले. काही दिवस नीरजने पानिपत स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेतले, नंतर पंचकुलाला गेला आणि तेथे प्रशिक्षण सुरू केले.

नीरजने आंतरराष्ट्रीय स्तरावर 6 प्रमुख स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत. त्याने 2018 मध्ये जकार्ता एशियन मेम्स, गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स, 2017 मध्ये एशियन चॅम्पियनशिप, 2016 मध्ये दक्षिण आशियाई गेम्स, 2016 मध्ये ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर 2016 मध्ये त्याने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here