ठाकरे सरकारकडून मालाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

0
91

मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली.मालाड मालवणी येथील इमारत दुर्घटनास्थळाला भेट देऊन पालकमंत्री आमदार अस्लम शैख यांनी पाहणी केली. तसेच येथील निवासी तसेच स्थानिकांशी संवाद साधला. जखमी रहिवाशांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

काल रात्रीपासूनच पालकमंत्री श्री. शेख मदतकार्याचा आढावा घेत होते.मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here