ठाण्यात दिव्यांग कायदा कार्यशाळा

0
127
ठाण्यात दिव्यांग कायदा कार्यशाळा
ठाण्यात दिव्यांग कायदा कार्यशाळा

ठाण्यात दिव्यांग कायदा कार्यशाळा

ठाणे | प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ (RPWD Act 2016) अंतर्गत कलम ३९ नुसार दिव्यांग व्यक्तींबाबत संवेदनशीलता व जागरूकता निर्माण करण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी बी. जे. हायस्कूल, कोर्ट नाका, ठाणे येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा बाबा आढावांच्या प्रकृतीची शरद पवारांनी घेतली विचारपूस

प्रास्ताविकात जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण होणे किती आवश्यक आहे यावर भर दिला. दीपिका शेरखाने (दिव्यांग विभागप्रमुख, यशवंतराव चव्हाण सेंटर) यांनी राष्ट्रीय न्यास कायद्यावर मार्गदर्शन केले. तसेच विनित भागोजी आणि खुशी गणोञा यांनी RPWD Act 2016 आणि कलम ३९ संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधांवर अनुभवाधारित चर्चा केली.

कार्यक्रमास तहसीलदार संदीप थोरात, कृषी विभाग प्रमुख मुनीर बाचोटिकर, सहाय्यक सल्लागार संगीता शिर्के, सल्लागार ॲड. प्रमोद ढोकळे, अनिल कुऱ्हाडे (समग्र शिक्षा) यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक साळुंखे यांनी केले.

शासकीय अधिकारी व विभागप्रमुखांना दिव्यांगांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सर्वसमावेशक समाजनिर्मितीस चालना देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. ठाणे जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व दिव्यांग क्षेत्रातील संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here