डॉ. रेड्डीज भारतात बनवणार रशियन व्हॅक्सीनचा डोस

0
69

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे भारतीय भागीदार आहेत. रशियन लस स्पुतनिक-V फक्त डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांमध्ये भारतात तयार केली जाणार आहे . या लसीची किंमत ९०० रुपयापर्यंत असण्याची शक्यता आहे.डॉ. रेड्डीज म्हणतात की स्पुतनिक-V ची पहिली मालवाहतूक 1 मे रोजी भारतात पोहोचली आहे.या लसीच्या आणखी काही माल येणे अपेक्षित आहे.

त्यामुळे भारतात स्पुतनिक-V ची निर्मिती होणार आहे.देशात कोविड केसची संख्या सतत वाढत आहे आणि कोविड-19 विरोधातील लढ्यात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण हेच सर्वात जास्त प्रभावी शस्त्र आहे. सर्व भारतीयांचे लसीकरण योग्य वेळी होणे हीच आमची प्राथमिकता आहे असे डॉ. रेड्डीचे को-चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जीव्ही प्रसाद यांनी सांगितले आहे.ऑगस्ट ते डिसेंबर या काळात देशात 216 कोटी लसींचे उत्पादन अपेक्षित आहे.स्पुतनिक V ला आतापर्यंत जगातील 60 देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here