कोरोनाचा हाहाकार आणि लसीचा तुटवडा यामुळे लसीकरण मोहीम मंद गतीने सुरू आहे. राज्यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यामुळे वाद सुरू आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकार आपले अपयश झाकण्यासाठी केंद्रावर आरोप करत असल्याचे म्हणाले होते. यानंतर आम्ही केंद्राने सांगितलेले सर्व नियम पाळत असल्याचे स्पष्टीकरण राजेश टोपे यांनी दिले होते.
तसेच महाराष्ट्रासोबत केंद्राकडून दुजाभाव केला जात असल्याचाही आरोप केला होता.आता यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ‘महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत, देशात सापडणाऱ्या रुग्णांमधून अर्धे रुग्ण हे महाराष्ट्रातील असताना महाराष्ट्राला लसींचा योग्य पुरवठा का केला जात नाही?
महाराष्ट्राला सापत्न वागणूक का दिली जात आहे? एका आठवड्यात महाराष्ट्राच्या लस पुरवठ्यात वाढ करण्यात आली नाही, तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारी वाहने बाहेर पडू देणार नाही’ असा इशारा राजू शेट्टी यांनी मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांना लिखित इशारा दिला आहे.