तीन हजार नौका समुद्रात जाण्यास सज्ज; उद्यापासून मासेमारी सुरू

0
89

रत्नागिरी-

जिल्ह्यात उद्यापासून (ता. १) मासेमारी सुरू होणार आहे. दोन महिन्याच्या कालावधीनंतर मच्छीमारी नौका समुद्रात झेपावणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी मच्छीमारांनी केली आहे. अजूनतरी मासेमारीसाठी वातावरण अनुकूल नसल्याचे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. मच्छीमारांनी २ तारखेपर्यंच वाट पाहून हवामानाचा अंदाज घेऊन मासेमारीसाठी समुद्रात जावे, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे. बंदी आदेश मोडणाऱ्या ९ नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी ३ रत्नागिरीतील असून बंदी आदेशाचे १०० टक्के पालन झाल्याचे मत आहे.


पावसाळी मासेमारी बंदी १ जूनपासून सुरू होते. परंतु यंदा तौक्ते चक्री वादळामुळे १४ मे पूर्वीच सर्व मच्छीमार नौका बंदरात आणि जेटीवर नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. बंदी आदेश मच्छीमारांनी १०० टक्के पाळला; मात्र उद्या मासेमारी बंदी उठत असली तरी २ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आहे. मच्छीमारांनी दोन दिवस वाट पाहून नंतर मासेमारीसाठी समुद्रात जावे असे आवाहन मत्स्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here