तैवानच्या काऊशुंग शहरातील 13 मजली इमारतीला गुरुवारी भीषण आग लागली. यामुळे 46 लोकांचा मृत्यू झाला आणि 79 लोक होरपळले आहेत. या इमारतीमध्ये राहणारे लोक हे शारीरिक विकलांग होते.ही इमारत सुमारे 40 वर्षे जुनी आहे. इमारतीच्या खालच्या भागात एक बार, रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉल होता, पण कोरोना महामारीच्या ताळेबंदीमुळे हे सर्व गेल्या अनेक दिवसांपासून बंद होते.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग खूप भीषण होती आणि आगीत इमारतीचे मजले जळून खाक झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की आग पहाटे 3 च्या सुमारास लागली.घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की त्यांनी पहाटे 3 वाजता स्फोटाचा आवाज ऐकला होता. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.