तोक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला

0
89

तोक्ते चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका हा महावितरणला बसला असून त्यामुळे महावितरणच्या एकूण 460 विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामध्ये 330 लो टेन्शन आणि 130 हाय टेन्शन विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात 880 विद्युत पोलही तुटले आहेत. विद्युत वितरणच्या नुकसानीचा प्राथमिक आकडा हा सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा आहे. त्याशिवाय वादळामुळे जिल्ह्यातील 21 सब स्टेशन ही बंद पडली होती. दुपारपर्यंत त्यापैकी 12 ते 13 सब स्टेशन सुरू करण्याचे काम पूर्ण झाले होते. तर उर्वरित सबस्टेशन सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील मनुष्यबळही जिल्ह्यात दाखल होत आहे.782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पोल पुर्णतः पडले आहेत. तर 305 विद्युत वाहिन्यांचे नुकसान अंशतः नुकसान झाले असून 1 विद्युत वाहिनीचे पूर्णतः नुकसान झाल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here