तौक्ते चक्रीवादळात नौदलाला १८८ लोकांना वाचविण्यात यश

0
79

तौक्ते चक्रीवादळाने मुंबईकडे कूच केले तेव्हा मुंबईच्या समुद्रात भारताचे 4 जहाज अडकले होते. या जहाजांवर 710 लोकं अडकले होते, यातील 215 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुंबईपासून 175 किमी अंतरावर हीरा फील्ड्सजवळ बार्ज P-305 वर रेस्क्यू मिशन सुरू झाले होते. या जहाजावर सर्वाधिक 273 लोकं अडकली होती त्यातील 177 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

बार्ज P-305 चे बचावकार्य INS कोलकाता आणि INS कोच्ची करत आहेत. पुढील काही तासात सर्व लोकांना सुरक्षित काढले जाईल. या जहाजाशिवाय, बार्ज गाल कंस्ट्रक्टरवर नावाच्या जहाजावर 137 जण अडकले होते,यातील 38 जणांना वाचवण्यात आले आहे.हे जहाज कोलबा पॉइंटपासून 48 नॉटिकल मैल उत्तरेकडे अडकले आहे. त्या जहाजावर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी इमरजंसी नाव वॉटर लिलीला पाठवले आहे. तर, इतर दोन जहाजांपर्यंत लवकरच मदत पोहोचवली जाईल. याशिवाय, CGS ,सम्राटदेखील मदतीसाठी जात आहे.

ऑईल रिग सागर भूषणवर 101आणि बार्ज SS-3 वर 196 लोकं अडकली होती. ही दोन्ही जहाज पिवाव पोर्टपासून 50 नॉटिकल मैल दक्षिण-पूर्वमध्ये अडकली आहेत. INS तलवारला रेस्क्यू मिशनसाठी पाठवण्यात आले आहे. नेव्हीचे सर्विलांस एअरक्राफ्ट P8I आणि हेलिकॉप्टर्सद्वारे रेस्क्यू मिशनवर लक्ष्य ठेवले जात आहे. यामधून एक जहार बार्ज P-305 आता बुडाले आहे. यामध्ये 273 लोक होते. नौदलाने सांगितले की, INS कोच्ची 188 लोकांना रेस्क्यू करुन परतले आहे. 22 जणांचे मृतदेह हाती लागले आहे तर 63 अद्याप बेपत्ता आहेत.

डिफेंस प्रवक्ते कमांडर मेहुल कार्णिक यांनी सांगितले की, ‘P305 जहाजावरुल 180 जणांना वाचवण्यात यश आले आहे. सोमवारी रात्री सात वाजता जहाज बुडाले. सध्या बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here