‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे गेट वे ऑफ इंडिया परिसराचे नुकसान

0
89

तौक्ते चक्रीवादळ मुंबईला थडकल्यानंतर समुद्रात प्रचंड लाटा निर्माण झाल्या होत्या.समुद्र खवळलेला असल्याने लाटांचा मारा समुद्र किनाऱ्यावर होत होता. लाटांच्या तडाख्यामुळे गेट वे ऑफ इंडिया आणि समुद्रादरम्यान उभ्या केलेल्या तटबंदीचे दोन प्रचंड मोठे दगड निखळून दूर फेकले गेले. तसेच गेट वे ऑफ इंडियाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी भोवती उभारलेल्या कठडय़ाच्या काही भागाचे लाटांच्या माऱ्यामुळे नुकसान झाले. पुरातन वारसा वास्तूचा दर्जा लाभलेल्या गेट वे ऑफ इंडियालगतच्या परिसराचे चक्रीवादळामुळे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

समुद्रकिनाऱ्यालगत असलेले गेट वे ऑफ इंडिया हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणस्थान आहे.या कमानीची पायाभरणी ३१ मार्च १९१३ रोजी करण्यात आली आणि १९२४ मध्ये ही वास्तू पूर्ण झाली. या कमानीची उंची २६ मीटर (८५ फूट) इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here