दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट समोर आल्यानंतर आता भारत सरकारने सक्तीचे पाऊलले आहे.दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाईन केले जाणार, असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मोदी म्हणाले की, कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटला आळा घालण्यासाठी आतापासूनच सतर्क राहण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात सूट देण्याच्या योजनांचा पुन्हा आढावा घेण्यात यावा. असे मोदींनी बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई विमानतळावर सर्व प्रवाशांची कोरोना तपासणी करत त्याचे अहवाल जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले जाणार आहे.कोरोना संबंधी नियमांचे पालन करा, सोशल डिस्टसिंगचे पालन करा, नियमीत मास्क घाला. असे आवाहन मुंबई महापौर किशोरीपेडणेकर यांनी केले आहे.
गुजरातमध्ये अफ्रिकासह इतर देशातून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश करताना RT-PCR चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात यूरोप, ब्रिटेन, ब्राझील, बांग्लादेश, बोत्सवाना, चीन, मॉरीशस, न्यूजीलैंड, जिम्बाब्वे आणि हांगकांग या देशांच्या नागरिकांना गुजरातमध्ये आल्यानंतर कोरोना तपासणी करून घ्यावी लागणार आहे.