आज दसऱ्याच्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे. देशभरात आज सोनं खरेदीला महत्त्व दिलं जातं. दसरा म्हणजे ‘सोन्याचा दिवस’ असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी सराफ बाजारात मोठी उलाढाल होत असते
काल गुरुवारी सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली होती. मुंबईत मुंबई- 47,980 रुपये (प्रति तोळा)असा सोन्याचा दर होता. सोन्याच्या सध्याच्या दरात ऐतिहासिक उच्चांकीपेक्षा तब्बल 8००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. सन 2020 च्या ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरांनी 56200 रुपये प्रति तोळा एवढा उच्चांक गाठला होता.