दहशतवादी कटातील साथीदार मुंबईतील धारावीत वास्तव्यास

0
58

दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी जान मोहम्मद शेख उर्फ ​​समीर कालिया, ओसामा उर्फ ​​सामी, जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद आमिर जावेद, मूलचंद उर्फ ​​’साजू’ उर्फ ​​लाला यांना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून अटक केली आहे. हे सर्व दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांना लक्ष्य करून मोठा स्फोट करण्याची योजना आखत होते.जान मोहम्मद शेखचे 20 वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा महाराष्ट्र एटीएसने केला आहे. 

यानंतर मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालियाच्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. समीर मुंबई सेंट्रलच्या सायन परिसरातील एमजी रोडवरील कलाबाखर परिसरातील झोपडपट्टीत राहते पत्नी आणि दोन मुली सोबत राहतो. मुंबई लोकलमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचा प्लान हे दहशतवादी करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यामुळे रेल्वे पोलिसांची एक महत्त्वाची बैठक रेल्वे मुख्यालयामध्ये रेल्वे आयुक्त कैसर खालिद, डीआरएमचे मोठे अधिकारी यांच्या उपस्थितीतआयोजित करण्यात आली आहे. रेल्वे आयुक्त कैसर खालिद यांच्यासह डीआरएमचे मोठे अधिकारी देखील यावेळी असणार असल्याची माहिती आहे.

मुंबईमध्ये रेकी झालेली नाही. मुंबईत रेकी केली जाईल, असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला एक माणूस आला आणि त्याने रेकी केली, ही बाब चुकीची आहे. तो ट्रेनने जात होता, तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिस आणि आम्ही मिळून सर्व कारवाई करू’ असे विनीतअगरवाल म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here