दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या दहावीचा निकाल लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली आहे.शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्या दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.५० गुण हे या विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांवरुन दिले जाणार होते. तर उर्वरीत 50 गुण हे दहावीच्या मूल्यमापनावर आधारित असणार आहेत. विद्यार्थ्यांना जर मिळालेले गुण समाधानकारक वाटत नसतील तर कोरोना प्रादुर्भाव संपल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊ शकणार आहेत.