दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड’

0
71
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड'

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासाचा ताण आणि त्यामध्ये रुग्णांची सतत वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशा घ्याव्यात हा महत्वाचा प्रश्न होता. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य हे आमच्यासाठी प्राथमिकता आहे.

दरम्यान आता या परीक्षा पुढे किती तारखेला घेण्यात याव्या याविषयी अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील’, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here