दादरच्या शिवाजी पार्कचे नूतनीकरण सुरु आहे .शिवाजी पार्क भागात धुळीचा प्रश्न होता. त्यामुळे तेथील अनेक रहिवाश्यांना बराच त्रास होत होता.त्यामुळे हि समस्या मिटवण्यासाठी दररोज पाण्याचे फवारे मारण्याची गरज होती. नूतनीकरण सुरु असताना मैदानात मध्ये चक्क 5 ठिकाणी गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत.
समुद्र अगदी ३०० मीटरवर असतानाही शिवाजी पार्कमध्ये अवघ्या 6 ते 7 फुटांवर गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडणे याचे आश्चर्य वाटत आहे पण भुगर्भतज्ञ नंदन सरांनी सांगितले कि माहीम पासून वरळी पर्यंत आणि दादर समुद्र किनारा ते सावरकर मार्ग एवाढा भाग वालुकामय असून या भागात अनेक गोड्या पाण्याचे स्त्रोत आहेत दादर परिसरात पूर्वीपासून घराघरांमध्ये गोड्या पाण्याच्या विहीरी होत्या. शिवाजी पार्क हा जीवंत गोड्या पाण्याचे स्त्रोत देणारा वालुकामय प्रदेश आहे आता त्या क्राँक्रीटच्या जंगलात जमिनीखाली गाडल्या गेल्या.
आता सापडलेल्या या नव्या विहीरींना समृद्ध करण्यासाठी शिवाजी पार्कच्या या विहीरी रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे सतत गोड्या पाण्यानं भरलेल्या राहतील अशी व्यवस्था होणार आहे. अतिरीक्त पाणी आग विझवण्यासाठी, इलेक्ट्रीसीटी जनरेट करण्यासाठी वापरता येईल सुमारे 3 कोटी रुपये खर्चुन संपूर्ण शिवाजीपार्कचे रूप पालटले जाणार आहे.भुगर्भतज्ञ नंदन सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले कि हा भुगर्भ साठा सापडल्यामुळे दादरच्या लोकांना त्याचा खूप फायदा होईल आणि कुणीही याचा गैरफायदा गहू नये.टँकरने या पाण्याचा दूर्वांपेर करू नये