“देवमाणूस” मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे

0
71

देवमाणूस’ने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.देवमाणूसच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते आणि या मालिकेचा टीझर रिलीज झाला आणि प्रेक्षकांमध्ये या नवीन भागाबद्दल पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं. त्यातच अचानक कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी ‘देवमाणूस’मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळाले.आपल्या ओळखीच्या परिसरात अचानक हे पुतळे पाहून प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यामुळे लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झालाय.डिसेंबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हे पर्व प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here