राज्याचे राजकारण सतत तापत ठेवण्याचे काम करणाऱ्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक भेट घेतली. मुंबईतील सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे घर .त्यांच्या या निवास्थानी जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले.
याबद्दलची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच ट्विट करुन सांगितली.आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होते.यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते गेले होते.शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.