देशाची राजधानी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला कट दिल्ली पोलिसांनी उधळला

0
76

सणासुदीच्या काळात मोठा दहशतवादी हल्ला देशाची राजधानी दिल्लीत करण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली या नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.दहशतवाद्याकडून बनावट पासपोर्टसह AK-47 गन आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलनं पूर्व दिल्लीच्या लक्ष्मी नगर परिसरात ही कारवाई केली. तो पाकिस्तानातील पंजाब प्रांताचा रहिवासी आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्याकडून दिल्ली पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यात एके-47 रायफल, एक हँड ग्रेनेड, 2 पिस्तूल आणि 50 काडतुसांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याच्याकडून एक बनावट पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे.दहशतवादी मोहम्मद अशरफसह त्याचे किती साथीदार दिल्लीत आहेत, याबाबत त्याची कसून चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here