पुणे येथील मायलॅब डिस्कवरी सलूशन’ नावाच्या कंपनीने भारतातील कॅव्हिडची चाचणी केवळ २ मिनिटात अहवाल देणारी किट बनविली आहे.या कितीला इकमर ने मान्यता दिली आहे आणि हि किट वापरण्यासंबंधीचा अहवालही जारी करण्यात आला आहे.
या किटच्या माध्यमातून लोकांना केवळ 2 मिनिटांमध्ये स्वतः टेस्टिंग करुन 15 मिनिटात रिजल्ट प्राप्त करता येणार आहेत. या टेस्टिंग किटची किंमत केवळ 250 रुपये ठेवण्यात आली आहे. ICMR ने जाहीर केल्याप्रमाणे , होम टेस्टिंग फक्त सिम्प्टोमॅटिक रुग्णांसाठी किंवा इतर कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी आहे. यासाठी गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन अप डाउनलोड करावे लागेल. मोबाइल अॅपवरुन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल असे ही होम टेस्टिंग किट तयार करणाऱ्या कंपनीने सांगितले आहे.
या टेस्टिंग किटचे नाव COVISELF (Pathocatch) आहे.
चाचणी कशी करावी.
या किटमधून नाकाचे सँपल घ्यावे लागेल.
होम टेस्टिंग करणाऱ्याला टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यावा लागेल.
हा फोटो ICMR च्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल.
यानंतर तो व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याचा निर्णय येईल
पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनसाठी ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचे पालन करावे लागेल.