देशात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टपर्यंत येणार- SBI रिसर्चचा दावा

0
177

देशात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टपर्यंत येणार असल्याची शक्यता आहे असा अहवाल एसबीआय रिसर्चसने दिला आहे. तिसऱ्या लाटेचा पीक हा सप्टेंबरमध्ये येईल. ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरूवात होईल असे SBI रिसर्चसने सांगितले आहे. जर कोविड प्रोटोकॉलचे योग्य प्रकारे पालन केले नाही तर अक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तिसरी लाट आपल्या पीकवर असू शकते.कोरोना दुसर्‍या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी कोरोनाचे संक्रमण अजून संपलेल नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळीही एसबीआय रिसर्चर्सने अहवालात  सादर केला होता आणि त्यात दुसर्‍या लाटेचा पीक हा मेच्या तिसर्‍या आठवड्यात येईल असे म्हंटले होते.त्याप्रमाणे कोरोना महामारी दरम्यान 6 मे रोजी भारतात एका दिवसात संसर्ग होण्याची ही सर्वाधिक संख्या होती.महाराष्ट्र आणि केरळसारख्या बड्या राज्यांत परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. 

रविवारी देशात 40,111 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या दरम्यान 42,322 लोक बरे देखील झाले.संसर्गामुळे 725 लोकांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here