देशात कोरोना लसीच्या 100 कोटी डोस पूर्ण

0
103

देशात कोरोना लसीच्या 100 कोटी डोस आज  पूर्ण झाले आहेत. लसीचे 100 कोटी डोस पूर्ण झाल्याची घोषणा करण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली आहे. 100 कोटी डोस पूर्ण करण्याच्या निमित्तानेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात जाऊन तेथील आरोग्यसेवकांशी चर्चा केली.

आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज 100 कोटी डोस पूर्ण करण्याच्या संदर्भात एक गाणे आणि एक चित्रपट लाँच करणार आहेत. हा कार्यक्रम लाल किल्ल्यावर दुपारी 12.30 वाजता ठेवण्यात आला आहे. या गाण्यात कैलाश खेरने आवाज दिला असल्याचे सांगितले जात आहे.तसेच, ज्या गावांनी 100% लसीकरण पूर्ण केले आहे त्यांना सांगण्यात आले आहे की त्यांनी पोस्टर आणि बॅनर लावून आरोग्य कर्मचाऱ्यांचा आदर केला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here