देशात24 तासांत आढळले 1.20 लाख कोरोना संक्रमित नवे रुग्ण

0
68

5 राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 66 टक्क्यांवर,1.97 बरे झाले तर 3,370 मृत्यू

देशात एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होताना दिसत आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 80 हजार 490 ने कमी झाला आहे.गेल्या 5 दिवसांपासून देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणात 1.50 लाखांपेक्षा कमी येत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 20 हजार 332 कोरोनाबाधीतांची नोंद झाली. तर एका दिवसात 1 लाख 97 हजार 371 रुग्ण बरे झाले असून यामध्ये 3 हजार 370 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत तर दुसरीकडे 5 राज्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांत संक्रमितांचा आकडा 66% टक्क्यांवर आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही नागरिकांनी गाफील न राहता मास्क,हात धुणे आणि गर्दी टाळणे,सोशल डिस्टेंसिंग करून येणाऱ्या कोरोनाच्या लाटांना थोपवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here