देश-विदेश: अरबी समुद्रात व एडनच्या आखातात आघाडीच्या विनाशिका आणि लढाऊ जहाजे तैनात

0
70
अरबी समुद्रात व एडनच्या आखातात आघाडीच्या विनाशिका आणि लढाऊ जहाजे तैनात

नवी दिल्ली- व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, अरबी समुद्रात व एडनच्या आखातात आघाडीच्या विनाशिका आणि लढाऊ जहाजे तैनात करून भारतीय नौदलाने तेथील टेहळणी मोठय़ा प्रमाणात वाढवली आहे.लायबेरियाचा ध्वज असलेल्या व २१ भारतीय कर्मचारी असलेल्या एम व्ही केम प्लुटो या जहाजावर भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ २३ डिसेंबरला ड्रोन हल्ला करण्यात आला होता.https://sindhudurgsamachar.in/kokan-जुगार-खेळण्यासाठी-जुगऱ्/

इराणचा पाठिंबा असलेले हुथी अतिरेकी अनेक व्यापारी जहाजांवर हल्ले करत असतानाच घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती.भारताकडे येत असलेल्या एम व्ही साईबाबा या कच्च्या तेलाच्या आणखी एका व्यापारी टँकरवरही दक्षिण लाल समुद्रात त्याच दिवशी संशयित ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे, मध्य व उत्तर अरबी समुद्रात सागरी टेहळणी वाढवल्याचे नौदलाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here